एकतेच्या पुतळ्याद्वारे येणार दुर्गम भागात विकासाचे वारे

एकतेच्या पुतळ्याद्वारे येणार दुर्गम भागात विकासाचे वारे – प्रा. विनायक आंबेकर

भारतीय नागरिकांमध्ये सध्या परदेश प्रवास हे नाविन्य राहिलेले नाही. पर्यटनासाठी प्रवासाचे ठिकाण निवडताना केवळ शहरी नव्हे तर छोट्या शहरातील आणि ग्रामीण भागातील भारतीय नागरिक सुद्धा आशिया, युरोप आणि अमेरिका किंवा आफ्रिका खंडातील देशांची निवड करतात. परदेशात प्रवास करताना अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा ( statue of liberty ) किंवा मलेशियातील घनदाट जंगलात उभारण्यात आलेली गेंटिंग रिसोर्ट ची भव्य मनोरंजन नगरी पहाताना आपल्या भारतात अशा पर्यटनाच्या सुविधा कधी निर्माण होणार हाविचार प्रत्येक भारतीयाच्या मनात सहजतेने येतो. १९९३ साली श्री मुरली मनोहर जोशी यांच्या बरोबर अमेरिका दौ-यावर गेलेल्या श्री नरेंद्र मोदींनि तेथील भव्य स्वतंत्रतेचा पुतळा ( statue of liberty ) पहातांना स्वताला नेमका हाच प्रश्न विचारला होता कि असे भव्य पुतळे आपल्या देशात का उभारले जात नाहीत ? गुजरातचे मुख्यमंत्री झाल्या वर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर मूर्त स्वरूपात आणण्याचे ठरवले आणि २०१० साली त्यांनी विचार पूर्वक सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु केले.

गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आल्या पासून श्री मोदिनी सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याला प्राधान्य देऊन तसेच नर्मदा कनालचे जाळे उभारून गुजरात आणि राजस्थान मधल्या १७६२० चौरस किलो मीटर दुष्काळी क्षेत्रातील शेत जमिनी ओलिता खाली अन्न्ण्याचा विक्रम केला होता. नर्मदा मुख्य केनाल ४५८ किलो मीटर लांबीचा तर त्याचे उप केनाल एकूण ५ हजार किलो मीटर लांबीचे आहेत. सरदार सरोवर धरणाला देशातील तथाकथित पर्यावरण वाद्यांचा प्रचंड विरोध होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकास विरोधी लौबीला यशस्वी पणे तोंड देऊन श्री मोदिनी गुजरात मधील कच्छ व सौराष्ट्र या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष संपवले. शेजारच्या राजस्थान मधील बारमेर आणि जालोर जिल्ह्याला पाण्याचा स्रोत उपलब्ध करून दिला.

याच बरोबरीने प्रत्यक्षात ज्या भागामध्ये नर्मदा धरण बांधले गेले त्या सापुताडा आणी विंध्याचल पर्वताच्या धरणाच्या आजूबाजूच्या भागातील आदिवासी जनतेच्या विकासासाठी काही नाविन्यपूर्ण प्रकल्प आणणे गरजेचे होते. हा भाग आदिवासी बहुल असून तेथील लोकांसाठी उपजीविकेच्या स्रोतांची निर्मिती, सामाजिक सुविधांची निर्मिती, त्या भागातील पर्यावरणाचे रक्षण, आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शिक्षण, आरोग्य, उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हे मुख्य प्रश्न उभे होते. त्याच बरोबरीने गुजरातच्या जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल यांचे यथोचित भव्य स्मारक गुजरात मध्ये तयार करण्याचा देखील मानस त्यांच्या मनात होता. या दोन्हीचा सुरेख संगम साधून त्यांनी २०१० साली नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला येथील साधू बेटावर एकतेचा पुतळा ( statue of Unity ) या नावाने सरदार यांचा भव्य पुतळा व स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला.

सरदार पटेल हे गुजरातचे सुपुत्र. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारताचे गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यंच्या अथक प्रयत्ना मुळेच ब्रिटीश कालीन असंख्य छोटी राज्ये आणि संस्थानांचे विलिनीकरण होऊन अखंड भारताची निर्मिती होऊ शकली. त्यांची प्रतिमा एक कणखर व क्र्रारी राज्यकर्ता म्हणून होती. त्यंचे वर्णन त्याकाळी लोह पुरुष म्हणून केले जाई. त्यांच्या या अपूर्व योगदानाची माहिती देशाच्या पुढील पिढ्या पुढे यावी या साठी या स्मारका मध्ये पटेलांच्या पुतळया बरोबरच एक भव्य संग्रहालय देखील तयार करण्यात आहे. या स्मारकासाठी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्ट हा मुंबई ट्रस्ट कायद्यखाली नोंदवलेला ट्रस्ट स्थपन करण्यात आला आहे. या ट्रस्टच्या उद्दिष्टामध्ये राष्ट्रीय पुरुषांची स्मारके उभी करण्या बरोबरच पर्यावरण पूरक पर्यटन, आदिवासी विकास, मासेमारी सारख्या उपजीविका आयामांचा विकास, आदिवासी जनते साठी शिक्षण, आरोग्य, उपजीविकेच्या संधींची निर्मिती, पर्यावरण रक्षण, ग्रीन पॉवर निर्मिती अशा अनेक आयामांचा समावेश आहे.

उभ्र्ण्यात आलेला पुतळा हा सध्या जगात असलेल्या सर्व पुतळ्यामधील सर्वात उंच पुतळा आहे. पुतळ्याची उंची १८२ मीटर म्हणजेच ५८७ फुट आहे.एकूण २० हजार वर्ग मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या स्मारक मध्ये श्रेष्ठ भारत भवन या नावाने तीन स्टार दर्जाचे ज्या मध्ये भोजन सुविधा, मीटिंग हाल, कार्यक्रम हाल या प्रकारच्या प्रवाश्यांच्या साठीच्या सुविधा असतील असे दोन मजली ५१ खोल्यांचे हॉटेल आहे. यातील किंग रूम आणि विशेष खोल्याना नदीच्या बाजूला बाल्कनी आहे. सरदार पटेलांच्या जीवनावरील एक प्रदर्शनी आणि विशेष दृक्श्राव्य कार्यक्रमाची सोय आहे. भारताच्या एकात्मतेवर एक लेझर व साउंड शो उपलब्ध आहे. या स्मारका मध्ये एक संशोधन केंद्र उभारण्यात आले असून त्या ठिकाणी आदिवासी जनतेशी संबंधित शेती, उपजीविका, आरोग्य ईत्यादी प्रश्नावर संशोधन करण्यात येईल. पुतळ्याला लागून हेवी ड्युटी लिफ्ट आहे ज्या मधून प्रेक्षा ग्गालरी मध्ये जाउन दूरवरचा निसर्ग रम्य परिसर पाहण्याचा आनंद सर्वांना घेता येईल. या स्मारक भोवती एक तळे तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष पुतळ्यापर्यंत जाण्या साठी फेरी बोटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल जेणे करून पुतळया पर्यंत वाहने गेल्यास होणारे प्रदूषण टाळले जाईल. या स्मारकाला पर्यटन व प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यात आले असून त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळे आजूबाजूच्या आदिवासी जनतेला रोजगार मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गुजरात मधील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करणारा आणि एखाद्या दुर्गम भागात भव्य पर्यटन स्थळ निर्माण करणारा हा भारतातील बहुदा पहिलाच प्रयत्न असेल.