अमेरिकेच्या विदेश व रक्षा सेक्रेटरी बरोबर श्री राजनाथ सिंग व श्री जय शंकर यांनी केलेल्या बेका कराराचे महत्व

News- Nation

अमेरिकेच्या विदेश व रक्षा सेक्रेटरी बरोबर श्री राजनाथ सिंग व श्री जय शंकर यांनी केलेल्या बेका कराराचे महत्व

आज अमेरिकेबरोबर झालेल्या बेका BECA ( Basic Exchange and Cooperation Agreement ) कराराचे महत्व विलक्षण आहे. अमेरिका हा उच्च दर्जाच्या संरक्षण तंत्रज्ञानात ( High Tech Defense Technology ) अग्रणी देश आहे. जगातील आपल्या जवळच्या मित्र देशांबरोबर अमेरिका ३ खास करार करते. त्यातले पहिले दोन मिलिटरी लोजीस्टिक आणि सुरक्षित संदेशवहन या बाबतचे असून ते दोन्ही देशांमध्ये आधीच करण्यात आले होते. गलवान खोर्यातील चीनची घुसखोरी आणि १५ जूनरोजी झालेल्या घटनेनंतर या तिस-या Geo-spatial data विषयीच्या कराराची गरज जास्त जाणवली होती. विदेश मंत्री श्री जय शंकर यांनी त्या दृष्टीने अमेरिकेचे सेक्रेटरी-स्टेट श्री माईक पोम्पियो ( Mike Pompeo)  यांच्याशी संपर्क करून हा मागे पडलेला करार लगेच पूर्ण करण्याचे  प्रयत्न सुरु केले होते. त्याच प्रमाणे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी देखील अमेरिकेचे डीफेन्स सेक्रेटरी श्री मार्क एस्पर ( Mark Esper) यांच्याशी संपर्क करून सायबर क्षेत्रातील सहकार्य वाढवले तसेच दोन्ही देशांच्या नौदलांचा एकत्र सराव घडवून आणणे असे प्रयत्न चालूच ठेवले होते. श्री मोदीनी श्री डोनाल्ड ट्रम्प याना भारतात बोलावून केलेल्या भव्य स्वागताच्या वेळीच डिफेन्स विषयातील सहकार्य वाढवण्याचे दोघांमध्ये ठरले होते. श्री मोदींची दूरदृष्टी न कळना-या मूर्ख टीकाकारांनी त्यावेळी त्या कार्यक्रमावर टीका केली होती. पण कोणत्याही प्रसंग, कार्यक्रम, भेट किंवा चर्चेतून भारताला काय मिळाले पाहिजे हे मोदीनी आधीच ठरवलेले असते आणि ती गोष्ट साध्य करूनच ते थांबतात हे आजच्या करारावरून सिध्द झाले. शिवाय अमेरिकेतील निवडणूक निकालाविषयीची अनिस्चीतीतता लक्षात घेऊन श्री मोदीनी निवडणूक निकालाची वाट न पाहता घडवून आणलेली ही एक चाणाक्ष खेळी देखील आहे.

जिओ स्पेशल इंटेलिजन्स हा आजच्या कराराचा मुख्य गाभा आहे. या कराराने भारताकडे भौगोलिक माहितीशी संलग्न असलेला गुप्तमाहितीचा मोठासाठा उपलब्ध होईल. या साठ्याचा उपयोग भारताकडील मनुष्यविरहीत घातक क्षेपणास्त्रे व शस्त्रसज्ज द्रोण यांची अचूकता वाढवण्यासाठी होणार आहेच शिवाय गलवान खो-या सारख्या दुर्गम भागातील शत्रूच्या हालचालींची जास्त अचूक माहिती सुद्धा मिळणार आहे.   भारताने लद्धाख भागात तैनात केलेल्या लांबटप्प्याच्या मिसाईलची घातकता आता प्रचंड वाढणार आहे. या पुढे चीनला कोणतीही चाल करताना शंभरवेळा विचार करावा लागेल. या करारावर सही करताना आज दिल्लीमध्ये भारतातर्फे श्री राजनाथ सिंग,श्री जय शंकर हे दोन मंत्री आणि एनएसए श्री अजित दोव्हाल तर अमेरिके तर्फे श्री माईक पोम्पियो आणि मार्क एस्पर हे उपस्थित होते. भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला केव्हाही कोणत्याही देशाने आव्हान दिले तर अमेरिका भारताच्या बाजूने भक्कमपणे उभी राहील असे श्री माईक पोम्पियो यांनी जाहीर केले. चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा त्यांनी विरोध केला आणि इंडो पेसिफिक क्षेत्रामधील शांतता आणि सुरक्षेसाठी या कराराची खरी मदत होईल असेहि त्यांनी  सांगितले. चीनच्या वाढत्या उपद्रवाला तोंड द्यायला आता भारत ख-या अर्थांनी सिद्ध झाला आहे.

लेखक- श्री विनायक आंबेकर

====  +  ====

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *