प्रधान मंत्री स्वामित्व योजना

प्रधान मंत्री स्वामित्व योजना

योजनेचे नाव         : प्रधानमंत्री स्वामित्व योजना

मंत्रालय             : पंचायती राज मंत्रालय

योजनेची सुरुवात      : २४ एप्रिल २०२०

योजनेची वेब साईट    : https://egramswaraj.gov.in

योजनेचा उद्देश      : योजनेचा मुख्य उद्देश्य गावातील गावकर्यांच्या मिळकतीचा अत्याधुनिक  ड्रोनसारख्या उपकरणानी मैपिंग करने आणि गावकर्यांच्या मिळकतींचे ( घर, जागा, शेत जमीन ई. ) अचूक रेकोर्ड तयार करने व गावकर्याना देणे. केंद्राचे व राज्याचे पंचायती राज खाते, राज्याचे रेव्हेन्यू खाते व सर्वे ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने हि योजना राबवण्यात येणार आहे. संपूर्ण गावाचे एकत्रित मिळकत रेकोर्ड तयार करणे ( Integrated Property Validation Solution ) व गावकर्याना देणे हा उद्देश आहे.  ग्रामीण भारतात नागरिक अनेक  पिढ्या आपल्या वडीलोपार्जीत मिळकतींचा उपभोग घेत असतात परंतु त्यांच्याकडे त्या मिळकतीची कागदपत्रे नसतात किंवा त्याबाबत वाद असतात. या योजनेद्वारे संपूर्ण गावाचे एकत्र मेपिंग करून हि अडचण सोडवणे हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मिळकतीचे रेकोर्ड असल्यास शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळू शकते असा त्याचा फायदा आहे मात्र मिळकतीवर कर्ज मिळवून देणे हा उद्देश नाही.

योजनेचे स्वरूप       : हि योजना सध्या ६ राज्यात निवडक जिल्ह्यात सुरु केलेली आहे. २०२४ पर्यंत सर्व देशभर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  मोदिनी राज्य कारभार हाती घेतला तेव्हा फक्त १०० ग्रामपंचायती ब्रोडबँड  कनेक्शनने जोडलेल्या होत्या. मोदिनी घेतलेल्या डिजिटल इंडिया प्रकल्पामुळे सध्या १लाख २५ हजार ग्रामपंचायतीना ब्रोडबँडने जोडलेले आहे. यापुढे ग्राम पंचायतीचा सर्व कारभार इंटरनेट द्वारे करण्याचा प्रयत्न आहे. ई ग्राम स्वराज पोर्टल व मोबाईल एप द्वारे या ग्राम्पन्चायती आपला संपूर्ण कारभार पारदर्शी पद्धतीने करतील.  या योजने द्वारे संपूर्ण गावातील  मिळकतीनची माहिती  कोम्प्युटरवर टाकून पारदर्शक व्यवहार करून गावातील तंटे बखेडे कमी करणे असे या योजनेचे स्वरूप आहे.

योजना कोणासाठी                  :  हि योजना भारतातील सर्व खेड्यांसाठी आहे. टप्याटप्याने सर्वत्र लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला हि योजना महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटका, हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात ट्रायल स्वरूपात सुरु झालेली आहे. टप्याटप्याने सर्व ठिकाणी सुरु होईल. योजनेविषयी माहिती त्या त्या राज्य सरकारच्या पंचायती राज खात्याकडे मिळू शकेल.

संकलक : प्रा. विनायक आंबेकर

====  +  ====

Tags- swamitva yojana, panchayati raj department, e gramswaraj , स्वामित्व योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *