पी एम किसान- किसान सन्मान निधी योजना

पी एम किसान- किसान सन्मान निधी योजना

योजनेचे नाव      : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना

मंत्रालय          : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

योजनेची सुरुवात   : १ डिसेंबर २०१८

योजनेचा उद्देश    : छोट्या आणि गरीब शेतकर्याना शेती साठी प्रत्यक्ष अर्थसाहाय्य देऊन त्याना बी बियाणे, मजुरी, खते या सारख्या शेती संबधित गरजांसाठी सावकाराच्या दारात जावे लागू नये याची व्यवस्था करणे व त्यांचे शेती उत्पन्न सुनिश्चित करणे.

योजना कोणासाठी  : हि योजना भारतातील ज्या शेतकरी परीवाराकडे २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी परिवार याच्या व्याख्येत नवरा बायको आणि अज्ञान मुले यांचा समावेश होतो.

योजनेचे स्वरूप    :  पात्र शेतकरी परिवाराला प्रतिवर्षी रु. ६०००/- ( अक्षरी रु.सहा हजार मात्र ) दर चार महिन्याने रु २०००/- च्या तीन हफ्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्स्फर दीली जाईल. हि रक्कम शेती सिझन च्या सुरुवातीला दिली जाईल.  या योजनेच सर्व खर्च केंद्र सरकार करणार असून दरवर्षी रु.७५०००/- कोटी रक्कम वाटली जाईल.

लाभार्थी कसे बनता येते  : १) जेव्हा योजना सुरु झाली तेव्हा १ डिसेंबर २०१८ ते १ फेब्रुवारी २०१९ हा कालावधी लाभार्थी निश्चितीसाठी ठेवण्यात आला होता आणि त्याची जबाबदारी राज्य सरकारे व केंद्रशासीत प्रदेशाचे व्यवस्थापन यांच्यावर देण्यात आली होती. २) त्यानंतर या योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी ग्राम सेवक, तलाठी तथा राज्य सरकारने या योजनेसाठी नेमलेले नोडल ऑफिसर यांना संपर्क करून नाव नोंदवू शकतो.  ३) आपल्या जवळच्या कॉमन सुविधा केंद्रातून माफक फी भरून ओन लाईन पद्धतीने नाव नोंदवता येते. ४) योजनेशी संबंधीत  https://pmkisan.gov.in/   या वेब साईट वरील फार्मर्स कॉर्नर या बटन मध्ये दिलेल्या लिंक मध्ये जाऊन शेतकरी स्वत:ची नोंदणी करू शकतो.

गावागावातील छोट्या व फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या छोट्या शेतकर्यांना शेती करण्यासाठी योग्य वेळेवर आर्थिक मदत पोहोचवणार्या या योजनेमुळे साधारणत: १२ ते १३ कोटी छोट्या शेतकरी परीवाराना या योजनेमुळे शेती करणे सुसह्य झाले आहे.

संकलक : प्रा. विनायक आंबेकर

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *