प्रधान मंत्री कुसुम योजना

प्रधान मंत्री कुसुम योजना

योजनेचे नाव      : प्रधानमंत्री कुसुम योजना

( Kisan Urja Suraksha evam Utthan Mahabhiyan-  KUSUM )

मंत्रालय          : नविन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय

योजनेची सुरुवात   : फेब्रुवारी २०१९

योजनेचा उद्देश    : शेतकर्याना शेतीवरील पाणी पुरवठ्यासाठी सोलरउर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देणे. सध्या जे पंप डीझेल किंवा विजेवर चालवले जात आहेत त्या ऐवजी शेतकर्यांना सब्सिडी सहित सोलर पंप पुरवणे. या योजनेमुळे प्रदूषण कमी होईल. शेतकर्याना वीज पुरवठा नियमित मिळेल.

योजनेचे स्वरूप      : या योजनेचे ३ भाग केले आहेत.                             1) त्यातील भाग A मध्ये ५०० किलो वेट KW ते २ मेगा वेट MW क्षमतेचे रीन्यूएबल एनर्जी पावर  प्लांट वैयक्तिक शेतकरी, सहकारी संस्था, पंचायत समिती किंवा फार्मर प्रोड्यूसर संस्था यांच्या लागवडीखालील किंवा पडीक जमिनीवर बसवले जातील. हे पावर प्लांट ग्रीड शी कनेक्ट केले जातील. त्या मधून निर्माण होणारी वीज वीज वितरण संस्था वीज नियामक आयोगाने ठरवलेल्या दराने विकत घेतील. यामुळे शेतकर्याना पडीक जमिनीचा वापर करून स्थायी उत्पन्न मिळवता येईल.  2) त्यातील भाग B मध्ये वैयक्तिक शेतकर्याना ७.५ अश्वशक्ती पर्यंतचा एक सौर पंप बसवण्यास सहाय्य करण्यात येईल.  ३) त्यातील भाग C मध्ये ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या पंपाचे सौर उर्जेत रूपांतरण करण्यास सहाय्य  करण्यात येईल. पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक वीज वापरून उर्वरीत वीज वीज वितरण संस्थाना  विकण्यास मान्यता देण्यात येईल.

योजना कोणासाठी  : हि योजना भारतातील ज्या शेतकरी परीवाराकडे शेतजमीन आहे व त्या शेत जमिनीसाठी खात्रीशीर पाणी पुरवठा आहे त्यांच्या साठी लागू आहे.

महाराष्ट्रासाठी योजना : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हीच योजना “ मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना”  म्हणून २०१९ मध्ये सुरु झालेली आहे. तीन वर्षात या योजनेखाली एकूण १ लाख वैयक्तिक शेतकर्यांना एकूण १ लाख ऑफ ग्रीड सोलर पावर ए जी व्यक्तिगत सोलर पंप बसवून देण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत शेतकर्यांनी र्त्यांच्या हिस्शाची ठराविक रक्कम भरल्यास त्यान ५ एकर शेती असलेल्या शेतकर्याना ३ एचपी डीसी व ५ एकराच्या पुढे शेती असलेल्या शेतकर्याना ५ एचपी डीसी पंप सेट बसवला जाईल. या योजनेत ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाही अशा ठिकाणच्या तसेच दुर्गम आणि आदिवासी क्षेत्रातील शेतकर्याना प्रमुख्याने पंप दिला जाईल.  ज्या शेतकर्याना वीज वितरण कंपनी कडून वीज पुरवठा प्राप्त आहे त्याना या योजनेचा फायदा मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या योजनेची संपूर्ण माहिती पुढील वेबसाईट वर उपलब्ध आहे.  https://www.mahadiscom.in/solar/index.html तसेच या योजनेचा अर्ज ओन लाईन करता येतो त्याची लिंक https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormNEW अशी आहे.

संकलक : प्रा. विनायक आंबेकर

====  +  ====

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *